CBSE Class 10, 12 Term 1 Result आजही नाही; पहा कधी पर्यंत लागू शकतो निकाल?

16 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा पार पडली असून देशात आणि परदेशातूनही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता.

Representational Image (Photo Credits: PTI)

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा सीबीएससी बोर्डाने (CBSE Board) त्यांच्या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या आहेत. यापैकी पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर -डिसेंबर 2021 मध्ये पार पडली आहे. आता विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आहे. अद्याप सीबीएससी बोर्डाने निकालाच्या (CBSE Board Exam Result Date) तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र सोशल मीडीयामध्ये फिरत असलेल्या काही माहितीनुसार तो निकाल काल, आज म्हणजेच 24,25 जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता होती. पण मीडीया रिपोर्ट्सनुसार आजही (25 जानेवारी) हा निकाल जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

टाईम्स नाऊच्या माहितीनुसार, यंदाच्या सीबीएसई बोर्डाच्या टर्म 1 च्या परीक्षांचा निकाल फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. सोबतच यंदा निकालामध्ये टर्म 1 चे मार्क्स ऑनलाईन वेबसाईट वर विद्यार्थ्यांना दिसणार नाहीत तर सीबीएसई ते थेट शाळांकडे पाठवू शकते. अजूनही CBSE's IT cell कडे मार्क्स अपलोड करण्याच्या कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं सूत्रांकडून समजते आहे. नक्की वाचा: CBSE Board Term 1 Exam Results च्या तारखेबाबत सोशल मीडियात जारी परिपत्रक खोटं; बोर्डाची माहिती .

यंदा सीबीएसई कडून टर्म 1 परीक्षा Multiple Choice Question स्वरूपात घेण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा पार पडली असून देशात आणि परदेशातूनही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता. हे देखील नक्की वाचा: CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही .

सीबीएसई टर्म 1 प्रमाणे आता टर्म 2 च्या परीक्षा घेण्याच्या तयारीमध्ये आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार आहेत. सध्या देशात मागील काही आठवड्यांमध्ये पुन्हा कोरोनारूग्णांची संख्या वाढल्याने अनेक राज्यात शाळा-कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामधूनच आपला अभ्यास पूर्ण करावा लागत आहे. मात्र सरकारने आगामी परीक्षांचा काळ पाहता 3 जानेवारीपासून देशभर कोविड 19 लसीकरण 15-18 वयोगटातील मुलांसाठी देखील खुले केले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा सुरक्षित वातावरणात विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाऊ शकतात अशी आशा आहे.