CBSE Board Exam 2024 Admit Cards: सीबीएसई बोर्डाने जारी केली 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स; cbse.gov.in वरून करा डाऊनलोड

तत्पूर्वी आज बोर्डाने हॉल तिकीट्स जारी केली आहेत.

CBSE | Twitter

सीबीएससी बोर्डाकडून (CBSE Board) 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट (Hall Ticket) जारी केले आहे. विद्यार्थ्यांना आता ही हॉल तिकीट्स अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा सीबीएससी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या तारखा JEE Main आणि NEET परीक्षा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या होत्या. बोर्डाच्या परीक्षेला सामोर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणं आवश्यक आहे. दरम्यान शाळा विद्यार्थ्यांना Pariksha Sangam portal वरून हॉल तिकीट डाऊनलोड करून देऊ शकतात.

कसं डाऊनलोड कराल तुमचं अ‍ॅडमिट कार्ड

हॉल तिकीट वर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, परीक्षा केंद्र, एक्झाम सेंटरचं नाव, परीक्षेसाठी रिपोर्टिंग टाईम याची माहिती मिळणार आहे. सोबतच परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांनी कोणते नियम पाळणं बंधनकारक आहे याची माहिती देखील हॉल तिकीटावर दिलेली असेल. CBSE Board Exam 2024 Datesheet: CBSE बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक झालं जाहीर; 'या' दिवशी होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा .

CBSE इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 13 मार्च 2024 रोजी संपेल आणि 12वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 2 एप्रिल 2024 रोजी संपेल. 10वी आणि 12वी बोर्डाच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेतल्या जातील. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत या वेळेत या परीक्षा होणार आहेत.