NEET UG 2024 Question Paper Leak Case: नीट यूजी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणी CBI कडून 6 आरोपींविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल

याशिवाय, ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक आणि एनटीए द्वारे NEET UG-2024 परीक्षा आयोजित करण्यासाठी केंद्र अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले उप-प्राचार्य या दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NEET UG | Representational Image (File Photo)

NEET UG 2024 Question Paper Leak Case: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने NEET UG 2024 प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध पाटणा येथील CBI प्रकरणांसाठी विशेष न्यायालयासमोर दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कलम 120-बी (गुन्हेगारी कट), कलम 109 (प्रवृत्त करणे), कलम 409 (गुन्हेगारी विश्वासाचा भंग), कलम 420 (फसवणूक), कलम 380 (चोरी), कलम 201 (पुरावा गायब करणे) आणि कलम 411चा समावेश आहे.

याशिवाय, ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक आणि एनटीए द्वारे NEET UG-2024 परीक्षा आयोजित करण्यासाठी केंद्र अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले उप-प्राचार्य या दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -NEET UG Counselling 2024 Postponed: नीट यूजी समुपदेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार)

प्राप्त माहितीनुसार, खालील सहा आरोपींविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बलदेव कुमार उर्फ ​​चिंटू, सनी कुमार, डॉ. अहसानुल हक (मुख्याध्यापक, ओएसिस स्कूल, हजारीबाग आणि हजारीबागचे शहर समन्वयक), मोहम्मद इम्तियाज आलम (उपप्राचार्य, ओएसिस स्कूल आणि केंद्र अधीक्षक), जमालुद्दीन उर्फ ​​जमाल (हजारीबागचे पत्रकार) आणि अमन कुमार सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. सीबीआयने यापूर्वी 1 ऑगस्ट 2024 रोजी 13 आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते. (हेही वाचा - NEET UG 2024 Re-Exam Result: NTA कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; exams.nta.ac.in वर पहा स्कोअरकार्ड)

तथापी, ओएसिस शाळेचे प्राचार्य डॉ. अहसानुल हक, NEET UG 2024 परीक्षेसाठी हजारीबागचे शहर समन्वयक म्हणून त्याच शाळेचे उपप्राचार्य आणि NEET UG 2024 परीक्षेचे केंद्र अधीक्षक मोहम्मद इम्तियाज आलम यांच्यासोबत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच इतर आरोपींनी मिळून NEET UG प्रश्नपत्रिका चोरण्याचा कट रचला होता.  (हेही वाचा: NEET UG 2024 Row: नीट पेपर फूटीप्रकरणात CBI ला मोठे यश; पाटणा येथून दोघांना अटक)

NEET पेपर लीक प्रकरणात आतापर्यंत एकूण 48 जणांना अटक करण्यात आली आहे. या पेपर लीकचे लाभार्थी ठरलेल्या उमेदवारांचीही सीबीआयने ओळख पटवली आहे. तसेच त्यांचे तपशील आवश्यक कारवाईसाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सीसोबत शेअर करण्यात आले आहेत. उर्वरित अटक आरोपींचा अधिक तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif