CAT 2020 Admit Card Released: यंदा कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट देणारे विद्यार्थी iimcat.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात CAT Exam Hall Ticket

विद्यार्थ्यांना त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स iimcat.ac.in या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहेत.

Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT 2020) परीक्षेसाठी काल (28 ऑक्टोबर) अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स iimcat.ac.in या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहेत. यंदा IIM इंदौर कडून या परीक्षांचं आयोजन करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबरला होणार्‍या या परीक्षेसाठी वर्बल एबिलिटी आणि रीडिंग कंप्रीहेंशन, डेटा इंटरप्रटेशन आणि लॉजिकल रीजनिंग, क्वांटिटेटिव एबिलिटी यांचा समावेश असणार आहे. दरम्यान या तिन्ही टप्प्यातील प्रश्नावली सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 40 मिनिटांचा वेळ दिला जाईल.

यंदा आयआयएम कॅट च्या परीक्षा देखील कोविड19च्या सावटाखालीच पार पडतील. देशभरात सुमारे 150 पेक्षा अधिक केंद्रांवर या परीक्षांचं आयोजन होणार आहेत. कॅट परीक्षा 3 स्लॉट्समध्ये होणार असून ऑनलाईन मोड मध्ये त्या घेतल्या जाणार आहेत.

अ‍ॅडमीड कार्ड डाऊनलोड कशी कराल?

CAT Exam 2020 साठी यावर्षी सुमारे 2,27,835 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यंदा 3 तासांऐवजी ही परीक्षा 2 तासांसाठी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी तुम्हांला अ‍ॅडमीट कार्ड हे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपात हे डाऊनलोड करून तुम्ही त्यावरील इंस्ट्रक्शन नक्की वाचा.