Maharashtra Board Exam 2024: महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; आता 10वी आणि 12वी च्या परीक्षांमध्ये पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार नाही
मीडिया रिपोर्टनुसार, या संदर्भात बोर्डाचे म्हणणे आहे की, मागील वर्षांच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिलेल्या वेळेत कथित प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Board Exam 2024: दहावी (SSC), बारावीच्या (HSC) परीक्षेबाबत महाराष्ट्र बोर्डाने (Maharashtra Board) मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता बोर्डाच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या 2024 च्या परीक्षांमध्ये दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. याचा अर्थ आता बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी फक्त 3 तासांचा अवधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वी बोर्ड 2024 च्या परीक्षांच्या वेळेत सुधारणा केली आहे.
यानुसार, आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 3 तास आणि प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, या संदर्भात बोर्डाचे म्हणणे आहे की, मागील वर्षांच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिलेल्या वेळेत कथित प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा -Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा )
महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 -
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, तर 10वीच्या वार्षिक परीक्षा 1 मार्च 2024 पासून होणार आहेत. अधिकृत वेळापत्रकानुसार, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 23 मार्चपर्यंत होतील. तर, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 22 मार्च पर्यंत चालणार आहे.
तथापी, दहावीच्या परीक्षेत पहिल्या दिवशी प्रथम भाषेचा पेपर होईल. त्याचबरोबर बारावीच्या पेपरमध्ये पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर घेण्यात येणार आहे. या परीक्षांना बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.