Bhopal School Girls Protest: मुलींनी पंखे तोडले, खिडक्या फोडल्या; भोपाळ येथील शाळेत विद्यार्थिनिंचे आंदोलन
आक्रमक विद्यार्थीनिंनी आंदोलन करत शाळेतील पंखे (Fans) आणि खिडक्यांची (Windows) मोडतोड केली आहे. सोरोजिनी नायडू मुलींची उच्च माध्यमिक शाळेत (Sarojini Naidu Girls Higher Secondary School,Bhopal) हा प्रकार घडला.
भोपाळ (Bhopal) येथील मुलींच्या सरकारी शाळेत विद्यार्थिनी (Bhopal School Girls Protest) आक्रमक झाल्या आहेत. आक्रमक विद्यार्थीनिंनी आंदोलन करत शाळेतील पंखे (Fans) आणि खिडक्यांची (Windows) मोडतोड केली आहे. शाळेतील शिक्षक आणि प्रशासन आपणास जबरदस्तीने शालेय आवाराची साफसफाई आणि मैदानावरील गवत काढण्यास सांगते. तसेच, वर्गात यायाल पाच मिनीटे जरी उशीर झाला तरी, शिक्षा म्हणून उन्हामध्ये उभे केले जाते. ही शिक्षा लहान मुलींनाही दिली जाते, असा विद्यार्थिनींचा आरोप आहे. आपणास होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थिनींनी बुधवारी (4 सप्टेंबर) जोरदार आंदोलन केले.
एकाच वेळी शकडो मुली मैदानात
भोपाळ येथील सोरोजिनी नायडू मुलींची उच्च माध्यमिक शाळेतील (Sarojini Naidu Girls Higher Secondary School,Bhopal ) विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने एकाच वेळी मैदानात आल्या. त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शालेय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केले. विद्यार्थिनींचा सर्वाधिक रोष हा वर्षा झा नामक महिला अधिकाऱ्यावर होता. ज्यांची काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली आहे. विद्यार्थीनिंनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंततर झा बाईंनी माफी मागितल्याचे समजते. (हेही वाचा, School Start Timings in Mumbai: शाळेचे वर्ग सकाळी 9 नंतरच भरवा, आधी भरवल्यास शाळांवर कठोर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा)
शालेय प्रशासनाकडून आरोपांचे खंडण
शालेय प्रशासनाने मात्र शाळेतील मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशासनाने म्हटले आहे की, शाळा प्रशासन आणि शिक्षक कोणत्याही प्रकारे विद्यार्थिनींना त्रास देत नाही किंवा त्यांना अनावश्यकपणे कामालाही लावत नाहीत. शाळेच्या मुख्याध्यापीका मालीनी वर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शाळा शिस्तीच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच शिस्तपालनासाठी शाळेने एका माजी सैनिकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभाग विद्यार्थींनींच्या मागण्या आणि तक्रारी यांवर गांभीर्याने विचार करेन, असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, Mother Suicide for CBSE Education: सीबीएसई शिक्षणाआड येणाऱ्या गरीबिला कंटाळून आईची मुलीसह आत्महत्या; निलंगा येथील घटना)
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी शाळेतील आक्रमक विद्यार्थिनींनी केलेल्या तोडफोडीची घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. ज्यामध्ये शालेय गणवेशातील अनेक मुली आक्रमकपणे आंदोलन आणि तोडफोड करताना दिसत आहेत. त्यातील काही मुली रागाने नामफलक, पंखे आणि खिडक्या तोडताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काही विद्यार्थींनी मैदानावर बसून आंदोलन करताना दिसत आहेत. काही लहान मुली आपल्या डोळ्यांवर येणारी सुर्याची किरणे हाताने आढविण्याचा अयशस्वी प्रयत्न करतानाही दिसत आहे.
शाळेच्या मुख्याध्यापीका झा यांच्याविरोधात अनेक मुली जोरदार घोषणा देताना आणि तीव्र नाराजी व्यक्त करत होत्या. मुलींचा संताप इतका अनावर झाला होता की, त्यातील काही मुलींनी आपल्याच वर्गात पंखे आणि खिडक्या फोडल्या. विद्यार्थीनिंनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना तक्रार केली की, शाळा सुटण्याची वेळ सायंकाळी 6 वाजताची आहे. ज्यामुळे दूर राहणाऱ्या मुलींना घरी जाण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच शाळा विद्यार्थिनींना देत असलेल्या शिक्षेमुळे अनेकींना आरोग्याच्या तक्रारीही सुरु झाल्या आहेत.