MMRCL Recruitment 2023: मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची उत्तम संधी: mmrcl.com वर व्यवस्थापकीय आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल.

Metro (PC- Wikimedia Commons)

MMRCL Recruitment 2023: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने व्यवस्थापकीय आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवार MMRCL च्या अधिकृत साइट mmrcl.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे, MMRCL संस्थेतील 22 पदे भरणार आहे. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 21 जून रोजी सुरू झाली होती आणि ती 1 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी सविस्तर बातमी वाचा...(हेही वाचा - MU IDOL Admission 2023: मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मधील प्रवेश प्रक्रियेला 15 जुलै पर्यंत मुदतवाढ)

MMRCL साठी रिक्त जागांचा तपशील -

महाव्यवस्थापक: 1 पद

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक: 2 पदे

उपमहाव्यवस्थापक: 2 पदे

सहाय्यक महाव्यवस्थापक: 5 पदे

उपअभियंता: 1 पद

पर्यावरण शास्त्रज्ञ: 1 पद

पर्यवेक्षक (ऑपरेशन सेफ्टी): 1 पद

पर्यवेक्षक (मटेरियल मॅनेजमेंट) : 1 पदे

कनिष्ठ अभियंता -II (ट्रॅक): 4 पदे

प्रकल्प सहाय्यक (वित्त): 2 पदे

निवड प्रक्रिया -

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एमएमआरसीएलची अधिकृत साइट पाहू शकतात. (हेही वाचा - ITI Admission Process: आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी 11 जुलैपर्यंत करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर)

MMRCL भर्ती 2023 साठी अर्ज करण्याची पद्धत -

मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही अत्यंत उत्तम संधी आहे. उमेदवार पात्रतेच्या अटी पाहून अर्ज करू शकतात.