Bank of Maharashtra Recruitment: 'बँक ऑफ महाराष्ट्र;मध्ये बंपर नोकरभरती; जाणून घ्या महत्वाच्या तारखा व कुठे करू शकाल अर्ज

या रिक्त पदांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण 203 जागांवर भरती होणार आहे

Bank of Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

बँकेत नोकरीची (Bank Job) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे जनरलिस्ट ऑफिसर्स, GO च्या पदासाठी नोकरभरती सुरु आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 500 लोकांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या माहितीनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत, GO ऑफिसर्स स्केल-II आणि स्केल-III प्रकल्प 2022-23 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.

बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे जनरलिस्ट ऑफिसर्स (GO) च्या पदासाठी जाहीर केलेल्या या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज 5 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात.

पदांचा तपशील-

बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण 500 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण 203 जागांवर भरती होणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी 137 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS प्रवर्गासाठी 50 जागा, एससी श्रेणीतील 37 जागा आणि एसटीसाठी 75 जागा भरती होणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज bankofmaharashtra.in या वेबसाइटवरून करता येतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

कोण अर्ज करू शकतो?

बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मंडळातून पदवी प्राप्त केलेली असावी. पदवीमध्ये 60 % गुण असणे अनिवार्य आहे. याशिवाय 3 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या रिक्त पदांसाठी अर्जदाराचे वय किमान 25 आणि कमाल 35 वर्षे असावे. (हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच 7200 पदांची पोलीस भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती)

अर्ज शुल्क -

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ही परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे.