Bank Of India मध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 7 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज
कारण बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे.
Bank Of India Recruitment: शासकीय बँकेत नोकरीची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार रिक्त 25 पदासाठी भरती केली जाणार असून यामध्ये 11 अनारक्षित, 9 ओबीसी, 2-2 एससी आणि एसटी आणि 1 इडब्लूएस वर्गासाठी आरक्षित आहे.(MPSC Exam 2021: खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 900 पदांची भरती; 'एमपीएससी'ने प्रसिद्ध केली जाहिरात, जाणून घ्या पदांची नावे व महत्वाच्या तारखा)
अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in येथे उपलब्ध करता येणार आहे. ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 24 डिसेंबर पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2022 दिली गेली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परंतु आरक्षित जागेच्या उमेदवारांना 175 रुपये अर्जासाठी शुल्क द्यावा लागणार आहे.
तसेच युनियन बँक स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भरती 2022 अधिसूचनेच्या नुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा अन्य कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात पास असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा कमी किंवा 40 वर्षापेक्षा अधिक नसावे.