Amity University ची वेबसाईट हॅक! Pornhub.com, Xvideos.com आणि Porn.com येथे जॉब मिळवण्यासाठी 3 लाखांची मागणी

यामुळेच एमिटी युनिव्हर्सिटीची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले.

Amity University Website Hacked (Photo Credits: amity.edu)

अॅमिटी युनिव्हर्सिटीकडून प्लेसमेंटबद्दल येणाऱ्या चुकीच्या संदेशांमुळे देशभरातील विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. यामुळेच अॅमिटी युनिव्हर्सिटीची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच विद्यार्थी आणि साईट व्हिझिट करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरती साईट न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. याचदरम्यान साईट हॅक झाल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे.

त्याचबरोबर साईटवर दिसणारा मेसेजही धक्कादायक आहे. विद्यापीठाचे प्लेसमेंट पेज यावर बजाज अलायन्झ आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या इतर रिक्रूटिंग सेल्ससह पोर्नहब डॉट कॉम, एक्स व्हिडिओ डॉट कॉम, पोर्न डॉट कॉम येथे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी 5००० डॉलर म्हणजेच 3 लाखांहून अधिक रुपये मागवण्यात येत आहेत.

सध्या अॅमिटीच्या वेबसाईटवर, "प्लेसमेंट नाही. एफ **  ऑफ आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्लेसमेंट देणार नाही, तुम्ही विद्यार्थी निरुपयोगी आहात. तुम्हाला काय वाटत? हे आमचे काम आहे? (sic.)" असा मेसेज दिसत आहे. इतकंच नाही तर XXX या वेबसाईटवर काम मिळवण्यासाठी 5000 डॉलर्स म्हणजेच 3 लाख रुपये मागवण्यात येत आहेत. तसंच हॅक केलेले पेज स्क्रोल केल्यावर 'कॉर्पोरेट्स जिथे अमिटियन्स कार्यरत आहेत' या कलमांतर्गत शीर्ष कंपन्यांसह अश्लील वेबसाइटचा उल्लेख करण्यात आला आहे

विद्यापीठाची वेबसाइट कोणी हॅक केली, याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, प्लेसमेंट पेजवरील अश्लील, वाईट मेसेजची विद्यार्थ्यांचा संबंध टाळण्यासाठी अॅमिटी युनिव्हर्सिटी नोएडाकडून साईट काही वेळ न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif