देशातील 42 टक्के विद्यार्थी शिकत आहेत Hindi-Medium मध्ये, तर 26 टक्के विद्यार्थी English मीडियममध्ये; जाणून घ्या 'मराठी' माध्यमाची स्थिती

सध्या देशातील तरुण पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा, भाषेचा फार मोठा पगडा असलेला दिसत आहे. पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या (English Medium) शाळेत घालण्यास उत्सुक असतात. मात्र देशातील 42 टक्क्यांहून अधिक मुले हिंदी माध्यमाच्या (Hindi Medium) शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

Representational Image (Photo Credit: unsplash.com)

सध्या देशातील तरुण पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा, भाषेचा फार मोठा पगडा असलेला दिसत आहे. पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या (English Medium) शाळेत घालण्यास उत्सुक असतात. मात्र देशातील 42 टक्क्यांहून अधिक मुले हिंदी माध्यमाच्या (Hindi Medium) शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यानंतर इंग्रजी माध्यमामध्ये 26 टक्के मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इनफॉरमेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) च्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार प्रादेशिक भाषांमध्ये बंगाली (Bangali) व मराठी (Marathi) आघाडीवर आहेत. देशातील 6 टक्के विद्यार्थी बंगाली माध्यमामध्ये शिक्षण घेत आहेत, तर मराठी माध्यमामध्ये 5 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानंतर 2 टक्के विद्यार्थ्यांसह तमिळ भाषेचा नंबर लागतो. 2019-20 च्या अहवालात भारतातील 15 लाखाहून अधिक शाळांमधील प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या सुमारे 26.5 मालाचा डेटा दर्शवण्यात आला आहे.

यूडीआयएसई+ च्या अहवालानुसार, केवळ 69 आणि 61 विद्यार्थी अनुक्रमे बिष्णुप्रिया मणिपुरी आणि डोगरी-माध्यम शाळांमध्ये शिकतात. महत्वाचे म्हणजे काश्मिरी माध्यमात एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही. एकूण 1,187 विद्यार्थी फ्रेंचमध्ये शिक्षण घेत आहेत तर, सिंधी माध्यमामध्ये 669 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अहवालात म्हटले आहे की सन 2019-20 मध्ये पूर्व-प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंत एकूण 26.45 कोटी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेतले, जे 2018-19 च्या तुलनेत 42.3 लाख जास्त आहे. 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर मुलींच्या नोंदणीत वाढ झाली आहे. पूर्व-प्राथमिक स्तरावर ही वाढ सर्वाधिक होती. (हेही वाचा: Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता)

शालेय शिक्षणामधील शिक्षकांची संख्या 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये 2.72 टक्क्यांनी वाढली आहे. 2019-20 मध्ये 96.87 लाख शिक्षक शालेय शिक्षणात गुंतले होते, जे 2018-19 च्या तुलनेत 2.57 लाख जास्त आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात, 9 विकेट गमावून केल्या 315 धावा; येथे पहा स्कोअरकार्ड

Share Now