Diwali School Holidays: लुटा दिवाळीच्या सुट्टींचा आनंद तब्बल 17 दिवस, शालेय शिक्षण विभागकडून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!

22 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यत विद्यार्थ्यांना शाळेला दिवाळीच्या सुट्ट्य़ा देण्यात आल्या आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

दिवाळी (Diwali) हा देशात साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण. दिवाळ सण शहरांपासून तर खेड्यापर्यत साजरा करण्यात येतो. या सणाचा उत्साह अगदी लहानग्यांपासून तर मोठ्या पर्यत बघायला मिळतो. दिवाळीची सुट्टी विद्यार्थ्यांपासून (Students) ते चाकरमान्यांपर्यत असते. शालेय विद्यार्थ्यांना तर शाळेचं पहिलं सत्र संपल्यानंतर खास दिवाळी (Diwali Holidays) निमित्त आठवड्याच्या सुट्ट्या देण्यात येते. पण यावर्षी शिक्षण विभागाच्या (Education Department) घोषणेनुसार विद्यार्थ्यांना तब्बल 18 दिवसांच्या सुट्ट्या (Holidays) मिळणार आहे. 22 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यत सुट्ट्य़ा देण्यात आल्या आहे. तर 8 ऑक्टोबरला गुरुनानक जयंती (Gurunanak Jayanti) असुन त्यादिवशी शासकीय सुट्टी (Government Holiday) आहे. म्हणजे एकूण 17 दिवसांच्या सुट्ट्या असुन 18 व्या दिवसी म्हणजे 9 नोव्हेंबरला (November) शाळा सुरु होणार आहे.

 

दिवाळीमुळे शिक्षकांसह (Teachers) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (Maharashtra Government Employee) नोव्हेंबरचे (November) वेतन ऑक्टोबर (October) अखेरीस मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील विशेष दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळणार आहे. तरी दिवाळी पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच नव्या सत्राचं शिक्षण विद्यार्थ्यांना नवे शिक्षक लाभू शकतील ही शक्यता नाकारता येत नाही. (हे ही वाचा:- ZP Schools to Shut Down: बंद होऊ शकतात ठाणे जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या 287 शाळा)

 

या दिवाळीच्या सुट्टीत (Diwali Holiday) विद्यार्थ्यांना विशेष गृहपाठ (Home Work) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहिणे (Eassy Writing) , वाचन सराव (Reading), अंक व अक्षर ओळख (Number and Letter Identification)  याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे. तरी या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना हा गृहपाठ देण्यात येणार आहे.