Jammu Kashmir Earthquake: जम्मू-काश्मीर हादरले! बारामुल्लामध्ये सगल दोन भूकंपाचे धक्के; 4.9 रिश्टर स्केलची तीव्रता

पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सलग दोन हादरे जाणवले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Jammu Kashmir Earthquake: अचानक जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले लोक घाबरून घराबाहेर पडले. सहा वाजेच्या सुमारास पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. तर, दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नसल्याचे कळते. कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून (NCS)सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Earthquake in Jammu & Kashmir:जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, रिक्टर स्केलवर तीव्रता 3.5 मोजली गेली)

मागील काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरला सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. वातावरणातील अशा बदलांमुळे जनजीवन धोक्यात येत आहे. पहिला भूकंप बालमुला, पुंछ आणि श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जाणवला. झोपेत असलेले लोक खडबडून जागे झाले आणि घराबाहेर आले. यावेळी काहींच्या घरातील भांड्यांची पडझड देखील झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा: Jammu And Kashmir Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के)

जम्मू-काश्मीरमध्ये महिनाभरातील हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी १२ जुलै रोजी बारामुल्लामध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की घरांचे पंखे थरथरू लागले. लोकांनी आपल्या कपाटात ठेवलेल्या वस्तूही हलताना दिसल्या. जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भूकंपामुळे पंखा वेगाने थरथरत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महिनाभरातील हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी १२ जुलै रोजी बारामुल्लामध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.