कोरोनाच्या (Corona Virus) नवीन प्रकार ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (Omicron Variant) सुरू असलेला धोका लक्षात घेता, देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या संचालनावरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 31 जानेवारी 2022 पर्यंत देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यास बंदी असेल. यापूर्वी 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ओमिक्रॉन देशात दाखल होताच सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला असून, जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर बंदी घालण्यात आली होती.
यानंतर, नुकतेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी माहिती देताना सांगितले की, नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच सुरू होऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस ते पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, आता पुन्हा पुढील वर्षी जानेवारीपर्यंत विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की कोरोनाचे हे नवीन प्रकार त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा 4.2 पट जास्त संसर्गजन्य आहे. हेही वाचा Nashik School Reopen: नाशिक शहरातील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु, पहिली ते सातवीचे वर्ग भरणार
डेल्टा प्रकारामुळे जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी भारतातही या विषाणूने कहर केला होता. सध्या Omicron प्रकारामुळे अनेक देशांनी पुन्हा प्रवासी बंदी लादण्यास सुरुवात केली आहे. देशात आतापर्यंत Omicron प्रकारांची 23 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या राज्यांमधून ही प्रकरणे समोर आली आहेत त्यात कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह 5 राज्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क आहे.
ओमिक्रॉनच्या धोक्याच्या दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी लसीच्या बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडे लॉबिंग केली आहे. त्याचवेळी, कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड चाचणीचे दर तात्काळ प्रभावाने कमी करण्यात आले आहेत. आतापासून रॅपिड आरटी पीसीआर चाचणीची किंमत 3600 रुपयांवरून 2900 रुपये आणि जनरल आरटी पीसीआर चाचणीची किंमत 700 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आली आहे. रॅपिड आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी सुमारे अर्धा तास ते 45 मिनिटे लागत आहेत, तर सामान्य आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी सुमारे 4 ते 6 तास लागत आहेत.