Delhi: दिल्लीतील डीटीसी बस चालकावर बेदम मारहाण, गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाजवळ एका गटाने डीटीसी बस चालकाशी वाद घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसचालकावर जीवघेणा हल्ला केला. व्हिडिओत दोन पुरुषाने चालकाला मारहाण करत आहे.

Delhi PC X

Delhi: दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाजवळ एका गटाने डीटीसी बस चालकाशी वाद घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसचालकावर जीवघेणा हल्ला केला. व्हिडिओत दोन पुरुषाने चालकाला मारहाण करत आहे. बळजबरीने त्याला कारमधून नेले आणि पोलिस ठाण्यात हजेर केले. घटनेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ परिस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा-गाझियाबाद येथे ब्लिंकीट स्टोरमध्ये दोन गटात हाणामारी, अनेक तरुण गंभीर जखमी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दिल्लीच्या सफदरजंग परिसरात घडली. बस आणि कारची धडक लागल्याने दोघांंमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले आहे. बस चालकाला कार चालकाने माराहाण केली. एका प्रवासाने या घटनेचा रेकॉर्डिंग केले आहे. या मारहाणीमुळे रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. बस चालकाला पुरुषांनी बळजबरीने कारमध्ये बसवले.

दिल्ली बस चालकाला मारहाण 

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, बस चालकाला दोन ते तीन जणांनी मारहाण केली. बसची कारला धडक लागल्यामुळे कार चालक संतापले. बस चालकाला मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. डीटीसी बस चालकाला हल्लेखोरांनी स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पोलिसांनी यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement