Puri Shocker! दारूच्या व्यसनाला विरोध केल्याने मद्यधुंद मुलाने केली वडिलांची हत्या; आरोपीला अटक

तो त्याच्या आई-वडिलांना मारहाण करायचा आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी पैशांची मागणी करायचा. त्याचे आई-वडील त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळले असल्याने कुटुंबात वारंवार भांडणे होत होती.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

Puri Shocker: ओडिशातील पुरीमध्ये आपल्या मुलाच्या दारूच्या व्यसनाला विरोध केल्याने वडिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिपिली ब्लॉक अंतर्गत असलेल्या सनकांती गावात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूचे व्यसन असलेला आरोपी रोज मद्यधुंद अवस्थेत घरी येत असे. तो त्याच्या आई-वडिलांना मारहाण करायचा आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी पैशांची मागणी करायचा. त्याचे आई-वडील त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळले असल्याने कुटुंबात वारंवार भांडणे होत होती.

नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी आला आणि त्याचे पालकांशी भांडण झाले. त्याने कुऱ्हाड धरून त्याच्या पालकांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मद्यधुंद आरोपीला त्याच्या वडिलांना पकडण्यात यश आले. (हेही वाचा - Indian Army Shoots Pak Intruder: जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा)

आरोपीने त्याला पुन्हा घरात ओढत नेले आणि तिथेच त्याने वडिलांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घरातून रक्ताने माखलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका दारूच्या नशेत तरुणाने वडिलांची वीट मारून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी मुलाला अटक केली. बाबेरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवैया गावात ही घटना घडली.