Driver Suffers Heart Attack In Moving Bus: राजस्थानमध्ये चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; पुढे काय झालं? वाचा सविस्तर वृत्त

दयाल सिंग असे चालकाचे नाव आहे. कंडक्टर मोहन गुर्जर यांनी सांगितले की, जेव्हा ड्रायव्हर दयाल सिंग बोनेटच्या दिशेने पडला तेव्हा मला वाटले की, तो लांब कट घेत असेल. पण नंतर त्याला काहीतरी त्रास होत असल्याचं मला जाणवलं.

Representative Image (Photo Credits: RawPixel)

Driver Suffers Heart Attack In Moving Bus: राजस्थानच्या चित्तोडगड (Chittorgarh) जिल्ह्यातून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे चालत्या बसमध्ये चालकाला (Driver) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर चालक थेट बोनेटवर डोक्यावर पडला. ही संपूर्ण घटना घडत असताना कंडक्टरने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्काळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जाऊन ब्रेक लावून बस थांबवली. बस थांबवल्यानंतर चालकाला रुग्णालयात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते.

ही संपूर्ण घटना चित्तोडगड जिल्ह्यातील रावतभाटा भागात घडली. बसस्थानकावरून बस निघाली आणि काही वेळाने चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. दयाल सिंग असे चालकाचे नाव आहे. कंडक्टर मोहन गुर्जर यांनी सांगितले की, जेव्हा ड्रायव्हर दयाल सिंग बोनेटच्या दिशेने पडला तेव्हा मला वाटले की, तो लांब कट घेत असेल. पण नंतर त्याला काहीतरी त्रास होत असल्याचं मला जाणवलं. (हेही वाचा -IIT Kanpur- Heart Attack While Giving Speech: आयआयटी कानपूरच्या मंचावर भाषण देताना हृदयविकाराचा झटका आल्याने शास्त्रज्ञ Sameer Khandekar यांचे निधन)

कंडक्टरने वाचवले प्रवाशांचे प्राण -

मोहनने सांगितले की, त्याने ताबडतोब हाताने ब्रेक दाबून बस थांबवली आणि बसची चावी काढली. सध्या चालकाचा मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. ड्रायव्हरने सकाळी निघण्यापूर्वी नाश्ता केला होता. (हेही वाचा - Heart Attack Risk: हृदयविकाराच्या झटक्याचा सोमवारी सर्वाधिक धोका; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा)

त्यादरम्यान त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याचे तपासात समोर आले. बसचालक दयाल सिंह रावतभाटा ते जयपूर मार्गावर बस चालवत असत. त्यांना सुमारे वर्षभरापूर्वी कंत्राटावर चालकाची नोकरी मिळाली होती. मृत दयाल सिंग यांना एक लहान भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी आहेत.