Anti-Radiation Missile Rudram-II: रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-II ची यशस्वी चाचणी; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून डीआरडीओ, हवाई दलाचे कौतुक

ओडिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी पार पडली.

Photo Credit - X

Anti-Radiation Missile Rudram-II : डीआरडीओने (DRDO) हवेतून जमिनीवर हल्ला करणाऱ्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-II (Anti-Radiation Missile Rudram-II)या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय. ओडिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-३० (Su-30MKI) मधून ओडिशाच्या किनारपट्टीवर सोडण्यात आले. डीआरडीओने सोशल मीडियावर त्यांच्या अधिकृत अकाउमटवरून पोस्टद्वारे ही माहिती दिली. सर्व निकषांमध्ये रुद्रम-२ ची चाचणी पूर्ण झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. यामध्ये प्रोपल्शन सिस्टीमपासून कंट्रोल आणि मार्गदर्शन अल्गोरिदमपर्यंत सर्व गोष्टींची पुष्टी करण्यात आल्याचं डीआरडीओनं सांगितलं. (हेही वाचा:Mission Divyastra: स्वदेशी अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 'मिशन दिव्यास्त्र'साठी PM Narendra Modi यांनी केले DRDO शास्त्रज्ञांचे अभिनंदन )

डीआरडीओसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सोशल मीडियावर पोस्टद्वारे क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल माहिती दिला. त्याशिवाय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, हवाई दल आणि उद्योग जगताचे अभिनंदन केले. 'या चाचणीमध्ये रुद्रम-२ च्या सर्व निकषांमध्ये परिपूर्ण बसले आहे. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलाची ताकद अनेक पटींनी वाढेल हे निश्चत, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

डीआरडीओने २९ मे रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० MK-I प्लॅटफॉर्मवरून रुद्रम-II हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रुद्रम-II ही स्वदेशी विकसित सॉलिड प्रोपेलेंट एअर-लाँच क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी शत्रूला लक्ष करून नष्ट करण्यास सक्षम आहे.