Delhi: डॉक्टरांची कमाल! 3 कापलेली बोटे पुन्हा जोडली; पायाच्या बोटापासून बनवला हाताचा अंगठा, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील घटना
सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक विभागाचे अध्यक्ष डॉ. महेश मंगल यांनी सांगितले की, आमच्यासाठी केवळ हाताची तीन बोटे चिरडून परत जोडणे हे आव्हान नव्हते, तर सर्वात मोठे आव्हान होते ते अंगठ्याची पुनर्बांधणी करणे. यासाठी आम्ही रुग्णाच्या उजव्या पायाच्या दुसऱ्या बोटाचे अंगठ्यामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.
Delhi: राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या (Sir Ganga Ram Hospital) डॉक्टरांनी असा एक वैद्यकीय चमत्कार केला आहे, ज्यामुळे डॉक्टरांचे पृथ्वीवर देवाचे अस्तित्व आहे यावर विश्वास बसतो. खरेतर, उत्तराखंडमधील एका कारखान्यात काम करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला 7 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे आणि एक अंगठा कापला होता. उत्तराखंडमधील एका कारखान्यात काम करत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला. जिथून रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यासाठी आठ तास लागले. यावेळी रुग्णाच्या बोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. चिरलेली आणि ठेचलेली तीन बोटे त्याने पॉलिथिनच्या पिशवीत सोबत आणली. परंतु, त्याने अंगठा आणला नव्हता.
सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक विभागाचे अध्यक्ष डॉ. महेश मंगल यांनी सांगितले की, आमच्यासाठी केवळ हाताची तीन बोटे चिरडून परत जोडणे हे आव्हान नव्हते, तर सर्वात मोठे आव्हान होते ते अंगठ्याची पुनर्बांधणी करणे. यासाठी आम्ही रुग्णाच्या उजव्या पायाच्या दुसऱ्या बोटाचे अंगठ्यामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्याचा हात पूर्णपणे कार्यक्षम होऊ शकेल. हे काम खूप कठीण आणि आव्हानात्मक होतं. (हेही वाचा - Pune: भारतात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्णावर Intestine Transplant शस्त्रक्रिया; वडीलांनी 200cm आतडं दान करुन वाचवले मुलाचे प्राण)
यासाठी डॉ. महेश मंगल यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती, ज्यात डॉ. एस.एस. गंभीर, डॉ. निखिल झुनझुनवाला आणि डॉ. पूजा गुप्ता प्लॅस्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग आणि डॉ. मनीष धवन यांचा समावेश होता. त्याच वेळी, जखमी व्यक्तीला तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि 10 तासांच्या मायक्रोसर्जरीनंतर सूक्ष्मदर्शकाखाली सूक्ष्म शस्त्रक्रिया करून नसा, धमन्या आणि चुरगळलेली हाडे पुन्हा जोडण्यात आली.
दरम्यान, जखमी व्यक्तीने अंगठा सोबत आणला नसल्याने डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या उजव्या पायाच्या दुसऱ्या पायाचे बोट कापून दुसऱ्या ऑपरेशनद्वारे डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडण्याचा निर्णय घेतला. हे ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आणि लांब होते. या शस्त्रक्रियेला सुमारे आठ तास लागले.
तथापी, 1981 मध्ये दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये 'डिपार्टमेंट ऑफ प्लास्टिक सर्जरी'मध्ये मायक्रोसर्जरी सुरू झाली. प्लास्टिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉ. महेश मंगल सांगतात की, तेव्हापासून हा विभाग औद्योगिक, कृषी, घरगुती, रस्ते वाहतूक अपघात इत्यादींमुळे विच्छेदन झालेल्या शरीराचे अवयव पुनर्रोपण करण्यासाठी सर्वोत्तम केंद्र बनला आहे. बोटे, पायाची बोटे, शिश्न, कवटी, कान, वरचे अंग इत्यादी अंगविच्छेदन केलेल्या शरीराच्या विविध अवयवांचे आतापर्यंत 500 पुनर्रोपण करण्यात आले आहे.
डॉ.महेश मंगल यांनी विच्छेदन केलेले अवयव आणण्याचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी विभक्त झालेल्या शरीराचे अवयव सोबत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कापलेला अवयव जिवंत ठेवण्यासाठी प्रथम ते स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ पॉलिथिनमध्ये टाकणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर हे पॉलिथीन बर्फाने भरलेल्या दुसऱ्या पॉलिथिनमध्ये ठेवा. कापलेला अवयव बर्फाच्या थेट संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. यानंतर, शक्य तितक्या लवकर, कापलेल्या अवयवांना पॉलिथिनसह रुग्णाला रुग्णालयात घेऊन जा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)