Diwali 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 'या' नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Happy Diwali 2020: देशभरात आज दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या या मंगलदिनी सर्वांना सुख शांती लाभावी यासाठी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. घराबाहेर रांगोळी, दरवाज्याला तोरण आणि आकाश कंदील या गोष्टी दिवाळीत घराची शान वाढवतात. याच पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यंदाची दिवाळी पर्यावरण पूरक आणि साधेपणाने साजरी करावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्याचसोबत कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नियमांचे सुद्धा पालन करावे असे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा ट्विट करुन दिल्या आहेत.(Happy Diwali 2020 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश WhatsApp Status,Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा प्रियजनांचा दीपावलीचा आनंद)
अमित शहा यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, दीपावली हा पवित्र सण असून देशातील जनतेच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी यावी, सर्वांचे आरोग्य उत्तम रहावेच हिच इच्छा. दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, प्रकाशोत्सवाच्या पावन पर्वात येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीवाळी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञान, उर्जा, आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी मिळावी.
अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, 'नरक चतुर्दशी' व 'लक्ष्मीपूजना'च्या शुभेच्छा! यानिमित्तानं राज्यातल्या ‘कोरोना’रुपी राक्षसाचा, समाजातल्या अज्ञान, अंधश्रद्धा, असत्यासारख्या दुष्प्रवृत्तींचा विनाश होवो. सर्वांना ज्ञान, धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी लाभो, अशी प्रार्थना करतो. शुभ दीपावली!
धनंजय मुंडे यांनी दिपावलीच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! दिल्या आहेत.
सुप्रीया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, कुबेराच्या श्रीमंतीसह महालक्ष्मीची कृपा आपणास निरंतर लाभो. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दीक शुभेच्छा. #HappyDiwali
यंदा दिवाळी कोविड 19 च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि गर्दी टाळत, सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाठी भेटी घेणं, भेटवस्तूंची देवाणघेवाण टाळा आणि सोशल मीडियात व्हर्च्युअली एकत्र येऊन साजरी करत सार्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.