Delhi Rape Case: 5 स्टार हॉटेलमध्ये NRI महिलेवर बलात्कार, कंपीनीच्या सीईओवर गुन्हा दाखल,दिल्लीतील घटना

दिल्लीतील चाणक्यपूरी भागातील एका एनआरआय महिलेवर एका खासगी कंपनीच्या सीईओने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Delhi Rape Case: दिल्लीतील (Delhi) चाणक्यपूरी भागातील  एका एनआरआय (NRI) महिलेवर एका खासगी कंपनीच्या सीईओने (CEO) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर  एका 5 स्टार हॉटेलमध्ये  बलात्कार केला. या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दिल्लीत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला ही, भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला होती. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 14 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत एक 5 स्टार हॉटेलमध्ये तिच्यासोबत बळजबरीने लैंगित अत्याचार केला. पीडित महिला आरोपी सीईओ असलेल्या कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करत होती आणि ती तिच्या काकांच्या ओळखीची होती आणि तिला ही नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली होती. महिला हॉटेल मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत होती. नोकरी दिल्यानंतर सीईओने तिच्यावर लैंगिक छळ केला.

शनिवारी या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चाणक्यपूर पोलिस ठाण्यात रेकॉर्डीच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत आहे. चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.