Delhi Fire: दिल्लीतील कारखान्याला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
Delhi Fire: दिल्लीतील (Delhi) निलोठी परिसरातील एका फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सकाळी निलोठी परिसरातील फॅक्टरीला आग लागली. अग्निशमन जवानांनी आग बऱ्याच वेळे नंतर आग नियत्रंणात आणली. दिल्ली अग्निशमन सेवा प्रमुख अतुल गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, निलोठी गावातील कारखान्यात सकाळी 8.52 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, "एकूण 10 अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. असं अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.