दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण: दोषी अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी घेतली आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
तसेच दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी केवळ पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील (Delhi Gang Rape Case) आरोपी अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता, आणि विनय शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court of Justice) धाव घेतली आहे. तसेच दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी केवळ पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाचा खटला पार पडला. त्यानंतर आता निर्भया प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायलयात चालणार का? तसेच या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हेही वाचा - मुंबई: YES बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या कोठडीत 20 मार्च पर्यंत वाढ; 16 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
या प्रकरणातील दोषी अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. राणा यांनी डेथ वॉरंट जारी केलं होतं. या वॉरंटनुसार, दोषींना 20 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता दोषींना फाशी देण्यात येणार होती. मात्र, आता दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. यात आरोपींच्या नातेवाईकांमध्ये आई, वडील, भाऊ-बहिण आणि मुलांचा समावेश आहे. मात्र, निर्भयाच्या आईने या सर्व प्रकरणानंतर आरोपी पळवाटा शोधत असल्याचं म्हटलं आहे.