Delhi Fire News: पेंट फॅक्टरीला आग; दिल्लीतील भीषण घटना, 11 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.ही घटना १५ फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली,

delhi Fire News

Delhi Fire News: दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.ही घटना १५ फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीच्या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही क्षणातच आग एवढी पसरली की, फॅक्टरीत संपुर्ण आगीत जळून खाक झाली. तर या आगीत अनेकजण जखमी झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. (हेही वाचा-  शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच;)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथील फॅक्टरीला आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे  तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवण्याचे काम केले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत अनेकजण जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लावली तेव्हा कामगार फॅक्टरीत काम करत होते. ही आग कशाने लागली यांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आगीनंतर परिसरात बराच वेळ गोधंळाची परिस्थिती निर्माण झाली. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु होते.