Delhi Fire: अलीपूरमधील तेल कारखान्यात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 34 बंब घटनास्थळी हजर
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.
Delhi Fire: दिल्लीतील अलीपूर भागात एका कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धुराचे लोळ परिसरात पसरत आहे. धुळीमुळे अनेकांना दम घुसमटल्याचा त्रास सहन करावा लागला आहे. आगीची माहिती कळताच कारखान्यातील सर्व कर्मचारी बाहेर पडले. (हेही वाचा- दिल्लीत नरेला भागातील कारखान्याला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल
मिळालेल्या माहितीनुसार,दिल्लीतील अलीपूर भागातील कारखान्याला आग लागली. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे 34 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवांनी अथक प्रयत्नांनी आग विझवण्याचे काम केले. आगीत कारखान्यातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहे. आग तेल बनवण्याच्या कारखान्याला लागली.
आगीची नोंद पोलिसांनी केली आहे. आग कश्याने लागली हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान दिल्लीत आगीच्या अनेक घटना घडत आहे. रविवारी दुपारी दिल्लीतील नरेला येथील भोरगड औद्योगिक परिसरात चप्पस आणि चप्पल बनवणाऱ्या कारखान्याला आग लागली आहे. साडे पाच तासांनंतर आग विझवण्यात यश आले.