New Delhi Crime: पतीने पत्नीचा डोक्यावर धाराधार वस्तूने केला हल्ला,आरोपी दिल्लीतून फरार

दिल्लीत पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात धारदार वस्तूने वार केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी फरार झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.

New Delhi Crime: पतीने पत्नीचा डोक्यावर धाराधार वस्तूने केला हल्ला,आरोपी दिल्लीतून फरार
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

New Delhi: उत्तर दिल्लीतील एका 27 वर्षीय महिलेवर बुधवारी तिच्या पतीने धारदार वस्तूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती दिल्ली पोलीसांना देण्यात आली. सलमा असे पीडित महिलेचे नाव असून ती दयालपूर भागातील मुंगा नगर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिच्या घरी हल्ला केला.

बुधवारी सांयकाळी महिलेच्या डोक्याला धारदार शस्त्राने वार केला.या घटनेत मोठी दुखापत झाली आहे आणि सध्या तिच्यावर जग प्रवेश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे," अशी माहिती पोलीसांनी देण्यात आली. या घटने मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने असं का केलं याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सलमाचा पती अजीम असं आरोपीचे नाव आहे. तो  सध्या फरार आहे. "आम्ही दयालपूर पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे." अजीमला शोधून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गुन्ह्यामागील हेतू अद्याप तपासात आहे,” अशी माहिती दिल्ली पोलीसांनी दिली.

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 10:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).