Delhi Crime: क्षुल्लक कारणांवरून 19 वर्षाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तीन आरोपी फरार

दिल्लीतील मीना बाजार येथे एका १९ वर्षीय तरूणाची तीन जणांनी चाकूने भोसकून हत्या केल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Representational image (Photo Credit- IANS)

Delhi Crime:  दिल्लीतील मीना बाजार येथे एका 19 वर्षीय तरूणाची तीन जणांनी चाकूने भोसकून हत्या केल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अरमान उर्फ कासिम असं मृत तरुणाचे नाव आहे, तो दिल्लीतील गाझियाबाद येथील लोनी येथे राहायचा. रविवारी पहाटे साडेचार वाजता जामा मशीद परिसरात ही घटना घडली. (हेही वाचा-  कुमठा गावात सापडला मुलाचा मृतदेह, तासाभरात उकलले गुढ, आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, मीना बाजार येथे तीन मारेकरूंनी 19 वर्षीय तरुणाची हत्या केली. रविवारी पहाटे साडेचार वाजता जामा मशीद परिसरात ही घटना घडली. "सकाळी 5.20 च्या सुमारास जामा मशीद पोलिस ठाण्यात माहिती मिळाली की डॉक्टरांनी एका व्यक्तीला मृत घोषित केले आहे, पोलिसांनी तात्काळ पथक घटना स्थळी पाठवले. घटनास्थळी चौकशी केली असता असे आढळून आले की, एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अरमान असं मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या वडिलांसोबत मीना बाजारात विक्रेता म्हणून काम करायचा.

प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, तरुणाचा आरोपी असलेल्या तीन मुलांशी कोणत्यातरी गोष्टींवर वाद झाला. वादामुळे त्यांच्या मोठ भांडण झालं. भांडणातून तरूणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 302आणि 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.