Delhi Accident: मादीपूर मेट्रो स्टेशनजवळ कारला ट्रकने धडक दिल्याने दिल्ली पोलिसाचा मृत्यू; आरोपी घटनास्थळाहून फरार

दिल्ली येथे रविवारी सकाळी एका पोलीस कर्मचारीच्या कारचा अपघात झाला. ट्रकने धडक दिल्यामुळे सकाळी अपघात झाला.

Delhi Accident: मादीपूर मेट्रो स्टेशनजवळ कारला ट्रकने धडक दिल्याने दिल्ली पोलिसाचा मृत्यू; आरोपी घटनास्थळाहून फरार
delhi accident PC twitter

Delhi Accident: दिल्ली येथे  रविवारी सकाळी झालेल्या एका दुःखद घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, मादीपूर मेट्रो स्टेशनजवळ, रोहतक रोडवर पोलीस कर्मचारी यांच्या  कारला मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिल्ली पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला. काही यांत्रिक समस्येमुळे कार थांबली होती आणि मयत बाहेर उभा होता तेव्हा त्याच्या कारला ट्रकने धडक दिली. अपघातात एक ट्रक मागून कारला धडकलेला आहे. ट्रकची डावी बाजू कारच्या ड्रायव्हरच्या बाजूने उंचावलेली दिसते ज्यामुळे दुर्दैवी अधिकारी ट्रकच्या वजनाखाली चिरडला गेला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

दिल्ली पोलिसांचे इन्स्पेक्टर जगबीर सिंग असे मृताचे नाव असून ते सध्या सुरक्षा युनिटमध्ये तैनात आहेत. ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. मयत झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचे पुढील तपास करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2023 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).