Sunita Kejriwal Tests Positive for COVID19: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोना विषाणूची लागण
मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनीही स्वत: ला होम क्वारंटाईन केलं आहे.
Sunita Kejriwal Tests Positive for COVID19: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहेत. पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनीही स्वत: ला होम क्वारंटाईन केलं आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये अरविंद केजरीवाल यांना कोरोनाचे काही लक्षणं जाणवत होते. परंतु, त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. दिल्लीत सध्या परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. (वाचा - मुख्य निवडणूक आयुक्त Sushil Chandra आणि निवडणूक आयुक्त Rajeev Kumar यांनी कोरोना विषाणूची लागण; इतर अधिकाऱ्यांनाही झाला संसर्ग)
दिल्लीत दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 23,500 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली. रविवारी 24 तासांत सुमारे 25,500 रुग्ण आढळले. दिल्लीत संक्रमण दर 24 वरून 30 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
Delhi CM Arvind Kejriwal quarantines himself as his wife Sunita Kejriwal tests positive for #COVID19; she has home isolated herself.
(File pics) pic.twitter.com/ZFBZ5Uw6tP
— ANI (@ANI) April 20, 2021
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे दिल्लीतील रुग्णालयात बेडची तसेच ऑक्सिजनचीही कमतरता जाणवत आहे. आता राज्य सरकारकडून तात्पुरती रुग्णालये बांधली जात असून बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे दिल्लीत आठवडाभराचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2021 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

