Coronavirus: भारतात कोरोना व्हायरसमुळे 30 जणांचा बळी; देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1071 वर पोहचली
यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. यातील 942 प्रकरणे सक्रिय असून आतापर्यंत 99 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत एकूण 15,24,266 प्रवाशांचे विमानतळावर स्क्रिनिंक करण्यात आलं आहे. रविवारी देशात कमीत-कमी 106 नवी कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1 हजाराहून अधिक झाला आहे.
Coronavirus: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1071 वर पोहचली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. यातील 942 प्रकरणे सक्रिय असून आतापर्यंत 99 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत एकूण 15,24,266 प्रवाशांचे विमानतळावर स्क्रिनिंक करण्यात आलं आहे. रविवारी देशात कमीत-कमी 106 नवी कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1 हजाराहून अधिक झाला आहे.
दरम्यान, आज पश्चिम बंगालमध्ये राज्यात आणखी एका कोरोनाग्रस्तचा मृत्यू झाला. तसेच महाराष्ट्रात मागील 12 तासांत कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 215 इतकी झाली आहे. आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी देशातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे. देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा व्हिडिओ शेअर करत सांगितलं आपल्या फिटनेसचं रहस्य; पहा व्हिडिओ)
सोमवारी संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 700,000 वर पोहचली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या कोरोनाव्हायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार जगात एकूण 704,095 कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी अमेरिकेत 132,637, इटली 97, 689, चीनमध्ये 82,122, स्पेनमध्ये 78,799, जर्मनीमध्ये 60,659 आणि इराण 38,309 जणांना कोरोनाची लागण झाली आहे