Delhi Police ACP Son Murder: हरियाणा कालव्यात सापडला दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह; आरोपीला अटक
मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. लक्ष हा त्याचे दोन मित्र विकास भारद्वाज आणि अभिषेक यांच्यासोबत सोमवारी हरियाणातील सोनीपत येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो घरी परतला नाही तेव्हा त्याचे एसीपी वडील यशपाल सिंग यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
Delhi Police ACP Son Murder: हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात कालव्यातून दिल्ली पोलिसातील उच्च अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. गन्नौर पोलिसांनी खुबडू ढाल कालव्यातून हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा लक्षचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफमध्ये तैनात एसीपी यशपाल सिंह यांचा मुलगा लक्ष्य (25) याची हत्या करण्यात आली. लक्ष्य हा दिल्लीत वकील होता. लक्षच्या दोन मित्रांवर 23 जानेवारी रोजी पैशाच्या व्यवहारावरून पानिपतच्या जटाल गावाजवळ त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने कालव्यात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेव्हापासून दिल्ली पोलीस आणि एनडीआरएफची टीम लक्षला शोधण्यासाठी मोहीम राबवत होती.
रविवारी सायंकाळी उशिरा गन्नौर येथून जाणाऱ्या खुबडू ढाल कालव्यातून लक्षचा मृतदेह सापडला. यानंतर खुबडू ढाल चौकी पोलिसांनी कारवाई करत अधिवक्ता लक्ष यांचा मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिला. खुबडू पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप कुमार यांनी सांगितले की, लक्षच्या हत्येचा गुन्हा दिल्लीच्या समयपूर बदली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh Suicide Case: आई ओरडली म्हणून 17 वर्षाच्या मुलीचा आत्महत्या, मध्यप्रदेशातील घटना)
याप्रकरणी समयपूर बदली पोलिस ठाण्यात कारवाई सुरू आहे. मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. लक्ष हा त्याचे दोन मित्र विकास भारद्वाज आणि अभिषेक यांच्यासोबत सोमवारी हरियाणातील सोनीपत येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो घरी परतला नाही तेव्हा त्याचे एसीपी वडील यशपाल सिंग यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. (महाराजाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील धक्कादायक प्रकार)
आरोपी अभिषेकला अटक केल्यानंतर चौकशीत असे उघड झाले की, 22 जानेवारी (सोमवार) दुपारी वकील विकास याने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला भिवानी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्याच्यासोबत येण्यास सांगितले. नंतर तो तेथे गेला मात्र पैशावरून वाद झाल्याने लक्षला कालव्यात ढकलून दिले.