Rajasthan Shocker: वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने रागाच्या भरात मुलीची आत्महत्या

यामुळे रागाच्या भरात तिने आत्महत्या केली. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राजस्थानमधील (Rajasthan) अजमेरमधील (Ajmer) ख्रिस्तीगंज पोलीस स्टेशन (Christiganj Police Station) हद्दीतील प्रगती नगर कोटडा (Pragati Nagar Kotda) येथील 16 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. मोबाइल पाहताना कुटुंबीयांनी तिला अडवून मोबाइल हिसकावून घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. यामुळे रागाच्या भरात तिने आत्महत्या केली. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. रिपोर्टनुसार, ख्रिस्तीगंज पोलिस स्टेशनचे एएसआय राजेंद्र कुमार यांनी माहिती दिली आहे की प्रगती नगर कोटडा येथील रहिवासी पारुल शर्माने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृताने लिहिलेली कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही.

मोबाईल पाहताना त्यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मयताने तिच्या खोलीत जाऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तिला रात्री उशिरा जेएलएन रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मृत पारुलने आत्महत्या का केली? हेही वाचा हा कुठला न्याय! 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 5 उठाबशा काढण्याची शिक्षा; Bihar मधील धक्कादायक घटना (Watch)

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृताचे वडील राहुल शर्मा यांनी मृताचे डोळे दान करण्यास संमती दिल्याची माहिती आय बँक सोसायटीचे कुलदीप यांनी दिली आहे. यानंतर त्यांच्या टीमने मृताच्या डोळ्यांचा कॉर्निया मिळवला, जेणेकरून मृत मुलीमुळे दोन जणांना जग पाहता येईल  .



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif