Cloudburst in Himachal Pradesh: ढगफूटीमुळे हिमाचल प्रदेशातील दमराली नाल्याला पूर, 30 मीटर रस्ता वाहून गेला, वाहतूक सेवा विस्कळीत

शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ढगफूटीमुळे भीषण पूर आला आहे तसेच मुसळधार पाऊस सुरु आहे.

Cloudburst | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Cloudburst in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) रामपूर उपविभागातील दमराली नाल्याच्या परिसरात ढगफुटी झाली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ढगफूटीमुळे भीषण पूर आला आहे तसेच मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूर आला त्यामुळे सुमारे ३० मीटर रस्ता तुटला. त्यामुळे गावकऱ्यांची जनजीवन विस्कळीत झालेली आहे. (हेही वाचा- मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुमारे ९ वाजता ढगफूटीची माहिती पोलिसांना देण्यात आली. तात्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली की, घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिमलाचे पोलिस अधिक्षक संजीव कुमार घटनास्थळी पाहणी करत आहे. गावात पूर आल्याने ३० मीटरचा रस्ता तुटला आहे त्यामुळे जवळपासचा टॉवर पूराच्या पाण्यात वाहून गेला. टॉवरचा संपर्क तुलटल्यामुळे मोबाईल नेटवर्क नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

माहिती मिळताच, शिमलाचे उपविभाग दंडाधिकारी निशांत तोमर आणि पोलिस उपअधीक्षक नरेश शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरु केली आहे. पोलिस अधिक्षक एसपी संजीव कुमार शिमलाचे उपायुक्त अनुपम कश्याप हे रामपूर येथील



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif