Andhra Pradesh: दलित तरुणाला गुंडांकडून बेदम मारहाण, पाणी मागताच अंगावर लघवी; घटनेनंतर समाजात संताप
पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) अनुसूचित जाती (एससी) सेलने निषेध केला आणि रस्तेही रोखले.
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एनटीआर जिल्ह्यात सहा जणांनी एका दलित तरुणाला (Dalit Youth) बांधून मारहाण केल्याचा आरोप आहे. तरुणाला मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर लघवीही (Urin) केली. मिळालेल्या माहितीनुसार, सहा आरोपींनी दलित तरुणाला चार तास पकडून मारहाण केली आणि जेव्हा त्याने पाणी मागितले तेव्हा आरोपींनी त्याच्यावर लघवी केली.
श्याम कुमार असे पीडित तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) अनुसूचित जाती (एससी) सेलने निषेध केला आणि रस्तेही रोखले. (हेही वाचा - Lulu Mall Sexual Harassment Case: लुलू मॉल लैंगिक छळ प्रकरणातील निवृत्त मुख्याध्यापकाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण)
टीडीपी एससी सेलचे अध्यक्ष एमएमएस राजू यांनी या निषेधाचे आयोजन केले होते. त्यांनी कांचीकाचर्लाजवळ महामार्ग रोखला आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी निदर्शने केली. निदर्शनांदरम्यान, आंदोलकांनी 'आम्हाला न्याय हवा' अशी घोषणाबाजी केली.
माध्यमांशी बोलताना टीडीपी एससी सेलचे अध्यक्ष म्हणाले की, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या राजवटीत दलितांवर हल्ले वाढले आहेत. राज्यात दलितांवर हल्ले होत आहेत.