Uttar Pradesh Shocker: मालगाडीच्या धडकेत CRPF जवानाचा मृत्यू, इटावा येथील घटना
उत्तर प्रदेशातील इटावा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत ३५ वर्षीय सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला अशी माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत 35 वर्षीय सीआरपीएफ (CRPF) जवानाचा मृत्यू झाला अशी माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पतीकडून पत्नीची क्रूर हत्या; काठीने मारहाण, दातांनी घेतला चावा, प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवले लाटणे, पोस्ट मॉर्टेम करताना डॉक्टरही हादरले
बरठाणा पोलिस ठाण्यातील हाऊस ऑफिसर देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, अली खुर्द गावातील रहिवासी असलेले जबर सिंह यांचा मृत्यू झाला. जबर सिंह शेतातून घरी जात होते. त्यावेळीस रस्ता ओलांडत असताना, समोरून येणाऱ्या भरधाव मालगाडीची धडक लागली. या धडकेत त्यांचा भीषण अपघात झाला. अपघातामुळे त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली की, दोन दिवसांपूर्वीच ते कामावरून घरी पसतले होते. छुट्टी निमित्त ते गावातील शेतीकडे गेली. शेतीकडून घरी येताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी जबर सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2024 03:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

