महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा उद्रेक; केंद्र सरकारचे तिन्ही राज्यांना पत्र

देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक ठरत आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक ठरत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात आढळून येत आहेत. दरम्यान, राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या त्रुटींसंबंधी केंद्र सरकारने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. तसेच अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने 50 केंद्रीय आरोग्य पथके रवाना केलेली आहेत.

केंद्र सरकारने या पत्रात टेस्टींग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टींग, कंटेन्मेंट मोहीम, रुग्णालयामधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये वेगवगेळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोवरून प्रश्न आहेत तर काही ठिकाणी टेस्टींगवर. तर काही हॉस्पिटल्समधील पायाभूत सुविधांवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. हे देखील वाचा- केंद्राकडून कोरोनावरील रेमिडेसिव्हर औषधांच्या निर्यातीवर बंदी, जाणून घ्या त्यामागील कारण

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात आज तब्बल 63 हजार 294 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 34 हजार 8 कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.65% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.