COVID 19 Vaccine: सीरम इंस्टीट्यूटची Covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin यांच्या दरात फरक किती? जाणून घ्या दोन्ही लसींचे दरपत्रक

भारत बायोटेक (Bharat Biotech) ने शनिवारी (24 एप्रिल) रात्री उशीरा ट्विटर पोस्टच्या माध्यमातून कोवॅक्सिन (Covaxin) बाबतच्या दरांची माहिती दिली. पाहा कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लशींचे दरपत्रक आणि दोन्हींमध्ये किती आहे फरक.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. नजीकच्या काळात लसीकरण उपक्रमाचा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने आपल्या कोविशिल्ड (Covishield) लसीचे दर जाहीर केले आहेत. हे दर 1 मेपासून लागू असतील. दुसऱ्या बाजूला भारत बायोटेक कंपनीनेही त्यांच्या कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर केली आहे. खासगी रुग्णालयांसाठी ही लस Adar Poonawalla कोविशिल्ड लसीपेक्षाही काहीशी महाग प्रमाणात खरेदी करावी लागणार आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) ने शनिवारी (24 एप्रिल) रात्री उशीरा ट्विटर पोस्टच्या माध्यमातून कोवॅक्सिन (Covaxin) बाबतच्या दरांची माहिती दिली. पाहा कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लशींचे दरपत्रक आणि दोन्हींमध्ये किती आहे फरक.

भारत बायोटेक कोवॅक्सिन दरपत्रक

भारत बायोटेक त्यांचे कोवॅक्सीन केंद्र सरकारला अवघ्या 150 रुपये प्रतिडोस या दराने देणार आहे. तर, राज्य सरकारांना हीच लस 600 रुपये प्रतिडोस दराने घ्यावी लागणार आहे. खासगी रुग्णालयांना ही लस घेण्यासाठी 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. कोवॅक्सीन जर विदेशात निर्यात करायची असेल तर त्यासाठी 15 ते 20 डॉलर इतके मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Coronavirus: केंद्र सरकार खरेदी केलेली Corona Vaccines राज्यांना मोफत देणार, लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ)

सिरम इन्स्टिट्युट कोविशिल्ड दरपत्रक

सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केलेल्या दर पत्रकानुसार कोविशिल्ड लसीचे दर खालील प्रमाणे

केंद्र सरकार- 150 रुपये प्रतिडोस

राज्य सरकार- 400 रुपये प्रतिडोस

खासी रुगणालय- 600 रुपये प्रतिडोस

युरोपीय देशांमध्ये कोविशिल्डचे दर (आकड्यांमध्ये बदल शक्य)

ब्राझील- 3.15 डॉलर

ब्रिटन- 3 डॉलर

अमेरिका- 4डॉलर

दरम्यान, सीरमने कोविशिल्ड लस भारताबाहेरही निर्यात केली आहे. त्यानुसार कोविशिल्डचे भारतातील दर जगभरातील देशांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात येत होता. सीरमने अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांना लसपुरवठा केला आहे.ज्या देशांनी कोविशिल्ड लस खरेदी केली आहे. त्यापैकी बहुतांश देश आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now