Covid-19 Vaccine: तीन वर्षांवरील मुलांना पुढील सहा महिन्यात कोरोना लस - आदर पुनावाला 

सध्या, सिरमची 'कोविशिल्ड' आणि इतर कंपन्यांची कोरोनाविरोधी लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.

Adar Poonawala (Photo Credit - Twitter)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सहा महिन्यांत मुलांसाठी अँटी-कोरोना लस बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, 'कोव्हॉवॅक्स'ची चाचणी सध्या सुरू आहे. लस उद्योगाशी संबंधित एका परिषदेत भाग घेत पूनावाला म्हणाले की, लहान मुलांची लस 'कोव्हॉवॅक्स' तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनापासून वाचवेल. सध्या, सिरमची 'कोविशिल्ड' आणि इतर कंपन्यांची कोरोनाविरोधी लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. आदर पूनावाला म्हणाले की, आम्हाला मुलांमध्ये गंभीर आजार दिसले नाहीत. सुदैवाने, मुलांबाबत घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, आम्ही येत्या सहा महिन्यांत मुलांची लस आणू. आशा आहे की ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असेल. ते म्हणाले की, देशात दोन कंपन्यांना लहान मुलांच्या लसीसाठी परवाना देण्यात आला असून त्यांची लस लवकरच उपलब्ध होईल.

Tweet

पूनावाला पुढे म्हणतात की, तुम्ही मुलांचे लसीकरण करून घ्या. त्यात कोणतेही नुकसान नाही. या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. तुमच्या मुलानां लसीकरण करायचे असेल तर सरकारच्या घोषणेची वाट पहा आणि त्यानंतर लस द्या, असे ते म्हणाले. Kovovax चाचणी अंतर्गत आहे आणि तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी चांगले परिणाम दाखवले आहेत. पूनावाला यांनी असेही सांगितले की ही लस लहान मुलानंवर कार्य करेल आणि संसर्गजन्य रोगांपासून मुलांचे संरक्षण करेल.

Omicron चा मुलांवर होणारा परिणाम याबद्दल काहीही सांगू शकत नाही

सीरमचे सीईओ म्हणाले की, कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रोनचा मुलांवर काय परिणाम होईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही. याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. होय, हे निश्चित आहे की कोरोना विषाणूचा आतापर्यंत मुलांवर फारसा परिणाम झालेला नाही.