Madhya Pradesh Bribe Case: शाजापूरमध्ये सहकार उपायुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लोकायुक्त पोलिसांची कारावाई

या प्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

bribe crime: ( Photo credit- FILE IMAGE)

Madhya Pradesh Bribe Case:  मध्य प्रदेशातील शाजापूर (Shajapur) शहरात सहकारी संस्थांचे उपायुक्त यांना 1 लाख  15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. लोकायुक्त पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी किला संकूल परिसरातून त्यांना रंगेहात पकडले. आरसी जरिया असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईनंतर शाजापूर किल्ला संकुलात असलेल्या सहकार विभागाच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला. (हेही वाचा-  कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत आहे; )

मिळालेल्या माहितीनुसार, लोकायुक्त पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी आर सी.जरियांच्या कार्यालयात धाड टाकली. कृषी उत्पादन खरेदी करणाऱ्या समित्यांच्या व्यवस्थापकांकडून खरेदी केलेल्या पिकाच्या प्रति क्वीटलच्या आधारे लाच मागितली होती. यांनी एकूण 1,15,000 रुपयांची लाच घेतली होती. जरियां यांनी ही रक्कम कार्यलायातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती.

लोकायुक्त पोलिस पथकाने माहिती मिळताच, नियोजनपध्दतीने या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी आर. सी. जरिया यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. पोलिसांनी आर. सी. जरिया यांना ड्रॉवरमध्ये पैसै ठेवताना पाहिले. ही बाब लक्षात येताच, त्यांना रंगेहात पकडले. लोकायुक्त पथकाने ड्रॉवरमधून लाचेची रक्कम जप्त केली. त्यांना देखील तात्काळ अटक करण्यात आले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कार्यलयात खळबळ उडाला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जरियाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता लोकायुक्त पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.