Jyotiraditya Scindia : 'जनतेला अंधारात ठेवणे, अराजकता पसरवणे काँग्रेसचे काम'; हिंडनबर्गच्या X पोस्टवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रीया
काँग्रेसने देशात अराजकता पसरवली, देशाला वादग्रस्त बाबींमध्ये गुंतवले, अशी टीका ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली आहे.
Jyotiraditya Scindia: हिंडेनबर्गच्या (Hindenburg Research) X पोस्टवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया(Jyotiraditya Scindia) यांनी प्रतिक्रीया देत काँग्रेसवर(Congress ) ताशेरे ओढले आहेत. 'काँग्रेसचे एकच काम आहे, देशात अराजकता पसरवणे आणि देशाला वादग्रस्त बाबींमध्ये गुंतवणे. पंतप्रधान मोदी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता भारताला प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गावर नेत आहे. काँग्रेसने सर्वाना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.' असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले. सध्या हिडनबर्गचे ट्विट देशभरात चर्चेचा विषय आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिडनबर्ग अहवाल सादर झाल्यानंतर अदानींचे (Adani Group)साम्राज्य कोसळले होते. त्यामुळे आता पुन्हा मोठे काही होणार का अशी शंका उपस्थित केली जात आहे. (हेही वाचा:Hindenburg Alleges SEBI Chairperson: अदानी मनी सिफोनिंग स्कँडलमध्ये सेबी अध्यक्षांचा सहभाग, हिंडनबर्ग रिसर्चचा खळबळजनक आरोप )
वर्षभरापूर्वी म्हणजेच 24 जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते. यामुळे शेअर बाजारात भूकंप झाला होता. यामुळे अदानी जगातील 2 नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट 36 व्या क्रमांकावर गेले होते. हिंडनबर्ग रिसर्चने दोन दिवसांपूर्वी पुन्हा ट्विट करत सर्व भारतीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'भारतात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील', अशा आशयाचे ट्विट अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने केले आहे. त्यामुळे आता कोणती कंपनी निशाण्यावर आहे? काय होणार आहे? शेअर बाजार कोसळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार असल्याचे ते संकेत आहेत. (हेही वाचा:Hindenburg Research Shares Cryptic Post: 'भारतात काहीतरी मोठे घडणार' हिंडनबर्गचे ट्विट; शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळ )
दरम्यान, यूएस-आधारित फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आरोप केला आहे की, SEBI चेअरपर्सन माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी मनी सिफनिंग स्कँडलशी संबंधित अस्पष्ट ऑफशोअर संस्थांमध्ये भाग लपवला होता. बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये असलेल्या या संस्था विनोद अदानींनी वापरलेल्या जटिल संरचनेचा भाग असल्याचा दावा फर्मने केला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
हिंडनबर्ग रिसर्च ही यूएस-आधारित कंपनी आहे जिची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. ही एक गुंतवणूक संशोधन संस्था आहे आणि एक कार्यकर्ता शॉर्ट-सेलिंग आहे. हिंडनबर्ग हे नाव 1937 हिंडनबर्ग आपत्ती या मानवनिर्मित आपत्तीनंतर ठेवण्यात आले. हिंडनबर्ग हे एक हवाई जहाज होते ज्याला हायड्रोजनने इंधन दिले होते. त्यात आग लागली आणि 35 जणांचा मृत्यू झाला. तर नॅथन अँडरसन ज्याची पार्श्वभूमी फायनान्स आहे आणि हे उदाहरण घेतात आणि म्हणतात की, त्याने ही कंपनी मानवनिर्मित आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सुरू केली.