Rahul Gandhi’s 54th birthday: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 54 वा वाढदिवस साजरा; दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत केक कापला (Watch Video)

काँग्रसचे राष्टीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत केक कापत राहुल गांधी वाढदिवस साजरा केला.

Photo Credit -X

Rahul Gandhi’s 54th birthday: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख व्यक्तिमत्व राहुल गांधी यांचा आज 54 वा वाढदिवस (Rahul Gandhi celebrate)आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेतेमंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यानिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहूल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला गेला. काँग्रसचे राष्टीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत केक कापत(Cake Cut) राहुल गांधी वाढदिवस साजरा केला. (हेही वाचा: राहुल गांधी रायबरेली लोकसभा जागा ठेवणार, वायनाड सोडणार; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांची माहिती (Watch Video))

व्हिडीओ पाहा-

त्यांच्या वाढदिवसानिमित्त बहीण प्रियंका गांधी यांनी देखील राहूल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पोस्ट पाहा-

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज बुधवार दिनांक १९ जून रोजी त्यांचे भाऊ आणि खासदार राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहुलला शुभेच्छा देताना प्रियंका गांधी म्हणाली आहे की, तू नेहमीच माझा मित्र आणि मार्गदर्शक राहशील. प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतःचा आणि राहुलचा एक फोटो शेअर करत प्रियंका गांधी यांनी लिहिले, “माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याचा जीवन, विश्व आणि इतर गोष्टींबद्दलचा दृष्टीकोन उजळतो. नेहमी माझा मित्र, माझा सहकारी, तार्किक मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि चमकत राहा.” , तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम!” प्रियांकाने शेअर केलेला फोटो एका राजकीय कार्यक्रमाशी संबंधित आहे. यामध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.