Firing on Congress Leader in Dholpur: 20 वर्षांच्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्याची ढोलपूरमध्ये रस्त्यावर गोळी झाडून हत्या
धौलपूरमध्ये बाजारात गोळीबार करून कॉग्रेस नेत्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी फरार झाल्याने शहरात पोलीसांनी बंदोबस्त लावला आहे.
Firing on Congress Leader in Dholpur: धौलपूरमध्ये बाजारात गोळीबार करून कॉग्रेस नेत्याची हत्या केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी धौलपूरच्या मानिया गावात कॉंग्रेस नेते मेहताब सिंग गुर्जर यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून बाजारपेठेत दहशत पसरवली होती. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीसांनी शहरात नाकाबंदी केली. पोलीसांनी मेहताब सिंग गुर्जर यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ते ८ लोकांनी बाजारात गोळीबार केला.२० वर्षे जुन्या वैमनस्यातून आरोपींनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
काँग्रेसचे मंगरूळ मंडल अध्यक्ष 50 वर्षीय मेहताब सिंग गुर्जर हे पटवार घराच्या उद्घाटनासाठी तंबूचे साहित्य घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानिया शहरात आले होते. मानिया शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी मेहताब गुर्जर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मेहताब गुर्जर यांच्या छातीत, डोक्यात आणि पोटात गोळ्या लागल्या होत्या.
या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेताच हल्लेखोर घटनास्थाळावरून पळ काढला. या प्रकरणी धौलपूर पोलीसांनी नोंद घेतली आहे. हल्लेखोर फरार झाल्याने पोलीसांनी शहरात कडक बंदोबस्त लावला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत. रात्री उशिरा पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला, तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2023 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

