काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक
2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांना अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.
काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Congress leader Hardik Patel) यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक करण्यात आली आहे. 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांना अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.
हार्दिक यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुनावणी दरम्यान पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. सध्या ते काँग्रेसचे नेते आहेत. पाटीदार आरक्षणासाठी 25 ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या सभेनंतर गुजरातच्या विविध भागांत हिंसाचार झाला होता. (हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला)
याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची सुनावणीला पटेल वारंवार गैरहजर राहत असल्याने अहमदाबादच्या एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध शनिवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली.