Madhya Pradesh News: मोबाईल, टीव्हीवर निर्बंध लावलण्याने मुलांची पालकांविरुध्दात तक्रार; 7 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता
मोबाईलवर गेम खेळणे, सतत रिल्स बघणे, चॅट करण हा दिनक्रमाचा भागच झाला आहे.
Madhya Pradesh News: तरुण पिढी असो वा लहान मुल मोबाईल आणि टीव्हीचा वापर हे अतिप्रमाणात करतात. मोबाईलवर गेम खेळणे, सतत रिल्स बघणे, चॅट करण हा त्यांचा दिनक्रमाचा भागच झालेला आहे. यामुळे दुसऱ्या अॅक्टीव्हीटीज कडे दुर्लक्ष होत असल्याने संतापून पालक या गोष्टीला निर्बध लावतात. पण हेच निर्बंध लावणे पालकांना अंगडलं आहे. इंदौर येथील दोन भांवडांनी मिळून आपल्या पालकांविरुध्दात थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. (हेही वाचा- मुलांमध्ये 'अश्या' प्रकारे वाढवा आत्मविश्वास; पालकांसाठी काही महत्त्वाचे टीप्स, जाणून घ्या)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील एका जोडप्याला मुलांच्या तक्रारीमुळे पोलिसठाण्यात जावं लागलं आहे. पोलिस ठाण्यानंतर पालकांना थेट कोर्टांचे चक्कर मारावे लागले आहे. दोन भांवडांनी मिळून स्क्रिन टाइमवर मर्या आणल्याबद्दल त्यांच्या पालकांविरुध्दात पोलिस ठाण्यात तक्रार केली. हे प्रकरण इंदौर शहरातील चंदन नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पालकांच्या सततच्या टोमण्याला कंटाळून ही तक्रार देण्यात आली आहे. तक्रारदार २१ वर्षीय तरुणी आणि ८ वर्षाच्या मुलगा आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पालकांवर कलम ३४२, कलम २९४, कलम ३२३ लावले आहे. ज्यात ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. पालकांविरुध्द चलानही सादर करण्यात आले. त्यानंतर पालकांना उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने पालकांविरुध्द जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या खटल्याला अंतरिम स्थगिती दिली. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. मुलांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, पालक त्यांना शिवीगाळ करतात. मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवतात. या तक्रारीवरून पालकांवर बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.