Rules Change 1st January 2023: सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा बिघडणार, 1 जानेवारी 2023 पासून बदलणार हे महत्वाचे नियम, जाणून घ्या, सविस्तर माहिती

हे सर्व बदल जानेवारी २०२३ च्या पहिल्या तारखेपासून लागू होत आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Rules Change 1st January 2023: 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ना काही बदल होतात , ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होतो. अशा परिस्थितीत, या बदलांबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. या बदलांमध्ये बँक लॉकर्स, क्रेडिट कार्ड, GST ई-इनव्हॉइसिंग, उच्च सुरक्षा नंबर प्लेट्स आणि CNG-PNG किमतींचा समावेश आहे. हे सर्व बदल जानेवारी २०२३ च्या पहिल्या तारखेपासून लागू होत आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती [हे देखील वाचा: Nostradamus Predictions for New Year 2023:नागरी अशांततापासून ते तिसऱ्या महायुद्धापर्यंत, 2023 साठी नॉस्ट्रॅडॅमसचे 5 भविष्यवाण्या, आत्ता पर्यंत अनेक भाकीत ठरले खरे ]

पाहा 

बैंक लॉकरचे नियम

RBI ने जारी केलेले बँक लॉकरचे नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. त्यांच्या अंमलबजावणीनंतर बँका लॉकर्सच्या संदर्भात आपण काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. तसेच लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. यासोबत जर तुमचे बँकेत लॉकर असेल तर तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत नवीन करार करावा लागेल. यासाठी बँका ग्राहकांना आत्तापासून एसएमएस आणि इतर माध्यमातून नियमातील बदलाची माहिती देत ​​आहेत.

क्रेडिट कार्डचे नियम

जर तुम्ही बिल पेमेंट आणि खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा बदल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचे धोरण काही बँका बदलू शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंटसंबंधी त्वरित निर्णय घेणे महत्वाचे ठरणार आहे.

जीएसटी ई-इनवायसिंग 

जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल संदर्भातही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2023 पासून, ई-इनव्हॉईस तयार करण्याची मर्यादा 20 कोटींवरून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ आता पाचपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना जीएसटी पोर्टलवरून इलेक्ट्रॉनिक बिले तयार करावी लागणार आहेत.

हाई सिक्योरिटी नंबर प्लेट

31 डिसेंबर 2022 ही देशातील अनेक राज्यांमध्येहाई सिक्योरिटी क्रमांक प्लेट बसविण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेपूर्वी तुम्ही तुमच्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नाही, तर तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. 

एलपीजीची किंमत 

देशात प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या किमती बदलतात. अशा परिस्थितीत १ जानेवारी २०२३ रोजी एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतात.