IPL Auction 2025 Live

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान; म्हणाले, गरज पडल्यास उत्तर प्रदेश मध्येही एनआरसी लागू करु

योगी म्हणाले की गरज पडल्यास उत्तर प्रदेशमध्येही एनआरसी (National Citizen Register) लागू केली जाईल.

Yogi Adidyanath (PTI)

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) यांनी एक मोठे विधान केले आहे. योगी म्हणाले की गरज पडल्यास उत्तर प्रदेशमध्येही एनआरसी (National Citizen Register) लागू केली जाईल. योगी यांनी आसाममध्ये एनआरसी संदर्भातला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. भारतातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे अभिनंदन केले पाहिजे. उत्तर प्रदेशात गरज पडल्यास आम्हीदेखील एनआरसी लागू करु, असे ते म्हणाले. ज्याप्रकारे आसाममध्ये (Asam) एनआरसी लागू केली आहे, ही अनेकांसाठी मोठी शिकवण आहे. तिथल्या अनुभवाच्या आधारे उत्तर प्रदेशातही एनआरसी लागू करु शकतो. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे महत्वाचे पाऊल आहे. यामुळे बेकायदेशीर गरिबांचा अधिकार हिरकावून घेणाऱ्यांना योग्यरित्या रोखले जाईल.

द इंडियन एक्स्प्रेसला ( The Indian Express) दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या (Ayodhya)प्रकरणावर सांगितले की, 'प्रत्येकाचा कोर्टावर विश्वास आहे. कोर्टाचा कोणताही निर्णय असो, आम्ही ते मान्य करू. याबदल काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे देखील वाचा-शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर लगावला टोला; म्हणाले, "कुणाच्या जाण्याने महाराष्ट्रात फरक पडणार नाही"

माहितीनुसार, इतर राज्यातही एनआरसी लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे. भाजप (BJP) खासदार आणि दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनीही दिल्लीत (Delhi) एनआरसी लागू करण्याविषयी बोलले होते. याआधी हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांनीही हरियाणामध्येही एनआरसी लागू केली जाईल, असे वक्तव्य केले होते.