Delhi News: मैत्रीणीला वाढदिवशी महागडे गिफ्ट देण्यासाठी आईचे दागिने चोरले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

दागिने चोरीला गेल्याची एफआयआर पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर तपास केला असता खरा चोर किशोरवयीन मुलगा असल्याचे समोर आले.

Apple iPhone

Delhi News: नैऋत्य दिल्लीच्या नजफगढ (Delhi Crime)भागातून ही घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवशी महागडी भेटवस्तू (Expensive Birthday Gift)द्यावी म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलाने आईचे सोन्याचे दागिने विकूण मैत्रीणीला आयफोन(iPhone) भेट दिला. त्यासाठी त्याने घरातून आईचे दागिने चोरले. त्याच्या आईला ही गोष्ट माहित नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठत तशी तक्रीर दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता महिलेचा मुलानेच दागिने चोरल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलाने आपल्या आईचे सोन्याचे कानातले, सोन्याची अंगठी आणि सोन्याची साखळी चोरली होती. काकरोळा परिसरातील दोन वेगवेगळ्या सोनारांना ते दागिने विकले. त्याातून त्याने आयफोन खरेदी केला होता. (हेही वाचा:Delhi Police Assistant Sub Inspector Commits Suicide: दिल्लीत सहाय्यक उपनिरीक्षकांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या )

कमल वर्मा या 40 वर्षीय सोनाराला अटक केली असून त्याच्याकडून एक सोन्याची अंगठी आणि कानातले जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी महिलेने घरफोडीची तक्रार नोंदवली होती. ज्यात तिने 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातून दोन सोन्याच्या चेन, सोन्याचे कानातले आणि एक सोन्याची अंगठी चोरल्याची तक्रार नोंदवली होती. अशी माहिती पोलिस उपायुक्त (द्वारका) अंकित सिंह यांनी एनडीटीव्हीला दिली. तक्रारीच्या आधारे, या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला आणि तपास हाती घेण्यात आला. (हेही वाचा: Noida Viral Video: नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये महिलेचा विनयभंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

पोलिसांनी घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्यात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. पथकाने पुढील तपासणीत शेजारच्या परिसरातून तपासनी केली. परंतू, त्या वेळी कोणीही संशयास्पद हालचाली पाहिल्या नसल्याचे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांवर लक्ष केंद्रित केले. घरफोडी झाल्यापासून तक्रारदाराचा मुलगा बेपत्ता असल्याचे आढळले. टीमने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रांची चौकशी केली असता त्याने मैत्रिणीला 50 हजारांचा आयफोन खरेदी करून दिल्याचे समजले.

पोलिसांनी त्याचा तपास केला. मात्र, तो फरार असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संध्याकाळी 6 वाजता त्याच्या घरी घराजवळ त्याला पकडले.पोलिसांनी त्याच्याजवळील आयफोन जप्त केला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला आपला सहभाग नाकारल्याचे असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, मैत्रिणीवर तिच्या वाढदिवशी जबरदस्त छाप पाडण्यासाठी, त्याने त्याच्या आईला पैसे देण्यासाठी विचारले. परंतु आईने त्याला नकार दिला आणि त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. या नकारामुळे संतप्त होऊन त्याने पैसे चोरले. असे चौकशीतून समोर आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now