Chirag Paswan Viral video: जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी धावले चिराग पासवान, बिहार येथील घटना
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना बिहारच्या शेखपुरा येथे घडली.
Chirag Paswan Viral video: केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान (Chirang Paswan) यांनी एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना बिहारच्या शेखपुरा येथे घडली. दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे अपघात झाला आणि वृध्द व्यक्ती रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होता. त्यावेळीस चिराग पासवान यांनी मदतीचा धाव घेतला आहे. हेही वाचा- गुजरातच्या श्रीमंत चोराला अटक, लाईफस्टाईल पाहून पोलिसांनाही बसला धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी चिराग पासवान हे त्यांच्या ताफ्यासह शेखपूरा पाटणा मुख्य रस्त्यावरून जमुईला जात होते. त्याचवेळी शेखपूरा येथील दयाली गावाजवळ अपघात घडला. यात एक वृध्द व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेले होते. हे पाहताच चिराग पासवान मदतीसाठी धावले. चिराग पासवान आणि त्यांच्या सहकार्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या वृध्द व्यक्तीला रिक्षात ठेवले आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी ५ हजार रुपये दिले.
पाहा व्हिडिओ
यावेळीस अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दयाळू पणा दाखवत वृध्द व्यक्तीला उपचारासाठी पैसे दिले. त्याच्या या घटनेचे फार कौतुक होत आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी जखमीला रिक्षातून का नेले? स्वत:च्या कारमधून का नाही नेलं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.