Explosion At Hazaribagh Factory: झारखंडमधील हजारीबाग येथे स्टील प्लांटमध्ये चिमणीचा स्फोट; एकाचा मृत्यू, 7 कामगार जखमी
हा स्फोट इतका जोरदार होता की तेथे काम करणारे कामगार हवेत दूरवर फेकले गेले. जखमी कामगारांपैकी हजारीबाग येथे उपचारासाठी आणलेले चौघे 80 ते 90 टक्के भाजले आहेत. या मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Explosion At Hazaribagh Factory: झारखंड (Jharkhand) च्या हजारीबाग (Hazaribagh) मधून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. वृत्तानुसार, जिल्ह्यातील बार्ही भागात असलेल्या पवनपुत्र स्टील प्लांट (Pawanputra Steel Plant) मध्ये झालेल्या स्फोटामुळे (Explosion) 7 कामगार गंभीररित्या भाजले आहेत. हा कारखाना अवघ्या दोन वर्षांपूर्वी येथे बांधण्यात आला होता. हा स्फोट एवढा जोरदार होता की, यात सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या चार मजुरांना हजारीबाग येथील आरोग्यम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पवनपुत्र स्टील आणि अलॉय प्लांटच्या चिमणीत स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की तेथे काम करणारे कामगार हवेत दूरवर फेकले गेले. जखमी कामगारांपैकी हजारीबाग येथे उपचारासाठी आणलेले चौघे 80 ते 90 टक्के भाजले आहेत. या मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेत जखमी झालेल्या इतर तीन मजुरांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा -Explosion In Gurugram Factory: हरियाणातील गुरुग्राम येथील फायरबॉल बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी)
स्फोटामुळे कारखान्याचे नुकसान -
झारखंड औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरण (JIADA) द्वारे बार्हीमध्ये औद्योगिक कॉरिडॉर विकसित केला जात आहे. त्याअंतर्गत येथे विविध उद्योग येऊ लागले आहेत. आज ज्या कारखान्यात स्फोट झाला, तो कारखाना दोन वर्षांपूर्वीच येथे सुरू झाला होता. स्फोटामुळे कारखान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. हा स्फोट कसा झाला याबाबत सध्या प्लांटकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा -Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video))
आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळी भेट -
प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता आणि बार्हीचे काँग्रेस आमदार उमाशंकर अकेला यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.