CJI NV Ramana On Political Parties: सरन्यायाधीशांनी राजकीय पक्षांवर ओढले ताशेरे; म्हणाले, 'न्यायपालिकेने त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा द्यावा अशी पक्षांची इच्छा आहे'
राज्यघटनेने प्रत्येक संस्थेला नेमून दिलेल्या भूमिकेची पूर्ण कदर करायला देश अजूनही शिकलेला नाही, अशा शब्दांत रमणा यांनी देशातील राजकीय पक्षावर ताशेरे ओढले आहे.
CJI NV Ramana On Political Parties: भारताचे सरन्यायाधीश एमव्ही रमणा यांनी न्यायव्यवस्था आणि विधिमंडळावर मोठे भाष्य केले आहे. सत्ताधारी पक्षांचा असा विश्वास आहे की, सरकारी कारवाई न्यायिक समर्थनास पात्र आहे. तसेच विरोधी पक्षांना न्यायपालिकेने त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्याची अपेक्षा आहे. पण न्यायव्यवस्था ही केवळ संविधानाला उत्तरदायी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. राज्यघटनेने प्रत्येक संस्थेला नेमून दिलेल्या भूमिकेची पूर्ण कदर करायला देश अजूनही शिकलेला नाही, अशा शब्दांत रमणा यांनी देशातील राजकीय पक्षावर निशाणा साधला.
शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्सने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना, CJI NV रमणा म्हणाले, "जसे आपण या वर्षी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहोत आणि आपले प्रजासत्ताक 72 वर्षांचे होत आहे. राज्यघटनेने प्रत्येक संस्थेला नेमून दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पूर्ण कौतुक करायला आपण अजूनही शिकलेलो नाही. सत्ताधारी पक्षाचा असा विश्वास आहे की, सरकारची प्रत्येक कृती न्यायिक असून समर्थनास पात्र आहे. विरोधी पक्ष न्यायपालिकेने आपली राजकीय भूमिका आणि कारणे पुढे चालवण्याची अपेक्षा करतात. मात्र, न्यायपालिका फक्त संविधानाला उत्तरदायी आहे." (हेही वाचा -Pakistani Child Entered The Indian Border: पप्पा-पप्पा म्हणत 3 वर्षीय पाकिस्तानी बालक चुकून पोहोचले भारतीय हद्दीत; बीएसएफ जवानाने मुलाला चॉकलेट देऊन केले कुटुंबाला परत)
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, संविधानात नमूद केलेले नियंत्रण आणि समतोल अंमलात आणण्यासाठी आपल्याला भारतातील घटनात्मक संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. व्यक्ती आणि संस्थांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवण्याची गरज आहे. लोकशाही सर्वांचा सहभाग आहे. युनायटेड स्टेट्सचे उदाहरण देऊन सरन्यायाधिशांनी भारतासह जगात सर्वत्र सर्वसमावेशकतेचा सन्मान करण्याच्या गरजेवर जोर दिला आणि समावेश नसलेला दृष्टीकोन हा आपत्तीला आमंत्रण आहे, असा इशारा दिला.
भारतीय समुदायाच्या कामगिरीचे कौतुक करताना CJI म्हणाले, अमेरिकन समाजाचा सहिष्णु आणि सर्वसमावेशक स्वभाव आहे जो जगभरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा आकर्षित करू शकला आहे. ज्यामुळे त्याच्या वाढीस हातभार लागला आहे. समाजातील सर्व घटकांचा व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विविध पार्श्वभूमीतील पात्र प्रतिभांचा सन्मान करणे देखील आवश्यक आहे.